मार्सेलो पेक्सी (Marcelo Paxi) असं या अधिकाऱ्याचं नाव असून तो ड्रग ऑफिसर (Drug Officer) होता. कोलंबियातील (Columbia) एका बीचवर (Beach) पेक्सीची दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ही घटना पेक्सीच्या प्रेग्नंट पत्नीच्या (Pregnant Wife) डोळ्यांसमोर घडली. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मार्सेलो पेक्सी हे 45 वर्षीय ड्रग ऑफिसर आणि त्यांची टीव्ही जर्नलिस्ट (TV Journalist) पत्नी क्लॉडिया अॅग्युलेरा (Claudia Aguilera) हे पॅराग्वेमधील हाय प्रोफाईल कपल होतं. क्लॉडिया टेलिव्हिजन नेटवर्क युनिकॅनलसाठी (Unicanal) काम करते. हे कपल काही दिवसांपूर्वी कोलंबियातील कार्टाजेना येथील इस्ला बारू (Isla Barú) येथे सुट्ट्यांचा आनंद घेत होतं. कोलंबियातील बीचवर असताना क्लॉडियानं ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमी पेक्सी यांना दिली होती. त्यानंतर काही वेळातच पेक्सी यांचा मृत्यू झाला. क्लॉडियानं कोलंबियन लॉ एन्फोर्समेंट इन्व्हेस्टिगेटर्स (Columbian Law Enforcement Investigators) दिलेल्या माहितीनुसार, पेक्सी आणि क्लॉडिया डेकॅमेरॉन हॉटेलच्या बीचवर एन्जॉय करत होते. त्यावेळी अचानक दोन संशयित त्या ठिकाणी आले. काही न बोलता त्यातील एकानं पेक्सीवर गोळ्या झाडल्या. त्यातील पहिली गोळी चेहऱ्यावर आणि दुसरी पाठीवर लागली.
पॅराग्वे नॅशनल पोलीस फोर्समधील (Paraguay National Police Force) सीनिअर ऑफिसर निमियो कार्डोझो हे या प्रकरणाच्या तपासात मदत करण्यासाठी कोलंबियामध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय, अमेरिकन ड्रग आणि इतर फेडरल एजंटही (Federal Agents) तिथे पोहोचले आहेत. कार्डोझो यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेक्सी आणि क्लॉडिया व्हेकेशनवर असल्याची खूप कमी लोकांना माहिती होती. जोपर्यंत आम्ही आरोपींना पकडत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असंही ते म्हणाले.
पोलीस चीफ जनरल जॉर्ज लुईस वर्गास यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, पॅराग्वेतील हाय-प्रोफाइल मनी लाँड्रिंग (Money Laundering) आणि ड्रग ट्रॅफिकिंग (Drug trafficking) केसेससोबत पेक्सी यांच्या हत्येचं कनेक्शन असू शकतं. त्यामुळे तपास यंत्रणेनं ट्रान्सनॅशनल क्राईम सिस्टिमवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. ही हत्या करण्यासाठी भरपूर प्लॅनिंग केल्याचं निदर्शनास आलं असून त्यासाठी खूप पैसे खर्च केले गेले आहेत.
क्लॉडियानं ज्या दोन संशयितांचा उल्लेख केला आहे, त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी कोलंबियन अधिकाऱ्यांनी 2 अब्ज पेसो (सुमारे 4 लाख रुपये) बक्षीस जाहीर केलं आहे.
0 Comments