-->

Ads

टी.डी.आर.एफ. वर्धापन दिनानिमित्त १ ते ९ मे या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन सप्ताहाचे आयोजन

यवतमाळ प्रतिनिधी- संजय जाधव

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी  अधिकृत असलेल्या  TDRF ला दिनांक 9 मे रोजी 17 वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्षी  सर्व TDRF जवान एकत्रित येऊन वर्धापन दिन साजरा करतात. त्यानिमित्त  TDRF द्वारा यावर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील TDRF अधिकारी व जवान 1 मे ते 9 मे या कालावधीत TDRF वर्धापन दिन साप्ताह साजरा करत आहेत. वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्ताहात TDRF जवानांकडून TDRF संचालक संस्थापक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

राळेगाव तालुक्यामध्ये दि.७ मे व ८ मे २०२२ रोजी TDRF जवानांकडून सायकल रॅली व एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. राळेगावचे तहसिलदार डॉ.रविंद्र कानडजे यांनी सायकल रॅलीला  हिरवी झंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. तहसिल कार्यालय येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून TDRF जवानांनकडून प्रदूषण मुक्त भारत, इंधन वाचवा, झाडे लावा झाडे जगवा अशा विविध सामाजिक विषयावर जनजागृती करण्यात आली. सोबतच एकता दौड च्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश TDRF जवानांकडून देण्यात आला. सायकल रॅलीचा व एकता दौड चा समारोप  तहसिल कार्यालय येथे करण्यात आला.दि. ९ मे २०२२ रोजी TDRF वर्धापन दिनी TDRF जवानांकडून तहसिल कार्यालय येथे वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धन संबंधित जनजागृती करण्यात आली.सोबतच ग्रामीण रुग्णालय व तहसिल कार्यालयात स्वच्छता अभियान राबवून तेथील परिसर स्वच्छ केला. या सर्व कार्यक्रमांमध्ये राळेगाव तालुक्यातील सर्व TDRF जवानांचा सक्रिय सहभाग होता.

 सर्व उपक्रम TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. सदरील उपक्रमांसाठी कंपनी कमांडर ऋषिकेश डोंगरे, संजना राऊत, सहाय्यक कंपनी कमांडर प्रवेश पवार, पायल येवले, कंपनी ड्रिल इंस्ट्रक्टर अनिकेत वनस्कर, कंपनी सेक्शन कमांडर शिल्पा सोयाम, आचल चहारे, आर्यन खिरकर, स्वप्निल येवले, नयन मुरखे, पंकज चंदनावत, लक्ष्मी चंदनावत, दुर्गा कुडवे, दिपाली आत्राम, फलक कुबडे, पुनम वनस्कर, सारिका सोयाम, सीमा मरस्कोल्हे, दीक्षा मरस्कोल्हे, प्रिया भोयर, समीक्षा तेलंग, निकिता राऊत, रीना तेलंगे, गायत्री मोहनापुरे, वेदिका देऊळकर, प्राजक्ता वागदे, संचिता वनकर, उन्नती मस्के, साक्षी अडत, गणेश कुळसंगे, धिरज महाजन, अनीषा राऊत, अनिकेत डवरे, कार्तिक डवरे, हर्ष पांडे, सुमित येलेकार, इत्यादी टीडीआरएफ अधिकारी व जवान सहभागी होते.

Post a Comment

0 Comments