आजकाल अतिशय क्षुल्लक कारणांवरुन अनेक लोक आत्महत्या करू लागले आहेत. बऱ्याच प्रकरणांमध्ये तर आत्महत्येचं कारण सगळ्यांनाच थक्क करणारं असतं. सध्या असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात जीवापेक्षाही मोबाईल महत्त्वाचा ठरला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात मोबाईलची मागणी पूर्ण न झाल्याने नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा अंगुरीने खोलीत जाऊन विष प्राशन केलं
तिची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथून डॉक्टरांनी तिला मेडिकल कॉलेज झाशी येथे रेफर केलं, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर मृत महिलेच्या घरात एकच खळबळ उडाली.
हे प्रकरण कोतवाली परिसरातील शहा पहारी गावातील आहे. हमीरपूरच्या पहरा येथील चंद्रशेखर यांनी दीड वर्षांपूर्वी आपली मुलगी अंगूरी (वय १९) हिचा विवाह कोतवाली परिसरातील शाह पहारी येथील नरेंद्रसोबत लावला होता. शनिवारी सायंकाळी अंगूरीने तिचा मेहुणा सुमित याच्यामार्फत सासरा मणिराम यांच्याकडे आपल्याला मोबाईल घेऊन देण्यास सांगितलं. त्यावर सासरच्यांनी मोबाईल घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र रात्री उशिरा अंगुरीने खोलीत जाऊन विष प्राशन केलं. तिची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. विवाहितेची मानसिक स्थितीही ठीक नसल्याचं सासरच्यांनी सांगितलं. तिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. विवाहितेच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, आम्ही नेहमीच तिचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून ती सतत मोबाईलची मागणी करत होती. तिला मोबाईल घेऊन देण्यासाठी तिचा पती दिवसरात्र कष्ट करत होता. मात्र तिचा सतत हट्ट सुरू होता. सध्या पोलीस सगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
0 Comments