शुक्रवारी 27 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वसईतील स्टेला संकुलातील सद्गुरूज हातमाग साडीच्या दुकानात दोन महिला आपल्या मुलीच्या लग्नासाठी साड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.
साडी पसंत करताना अतिशय हुशारीने, जिथे एखादी महिला साडी पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष वेधून घेते, त्याचवेळी दुसरी महिला दुकानदारानं दाखवलेली साडी आपल्या साडीच्या आत लपवायची. दोन्ही चोरट्या महिलांनी दोन ते तीन वेळा दुकानदाराला बोलण्यात अडकवून नऊ सिल्क पैठणी साड्यांची चोरी केली आणि साडी न घेता दुकानातून परत गेल्या.
या दोघी महिलांनी दुकानात उपस्थित दुकानमालक चेतन भट्ट यांना गंडवून साड्यांवर डल्ला मारला. पण दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली आहे.
0 Comments