-->

Ads

मोटरमॅनने 800 प्रवाशांचा जीव घातला धोक्यात; रेल्वेकडून 3 कर्मचाऱ्यांचं तत्काळ निलंबन, गुन्हा दाखल


 सोमवारी अहमदाबादहून (Ahmadabad News) दिल्लीला जाणाऱ्या आश्रम एक्सप्रेस (Indian Railway ) ट्रेनमध्ये निष्काळजीपणाची मोठी घटना समोर आली आहे. या कारनाम्याचा त्याने फेसबुक लाइव्ह पण केला होता. याबाबत रेल्वे प्रशासनाला कळताळ खळबळ उडाली. विभागाने या घटनेसाठी जबाबदार असलेल्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सोमवारी सायंकाळी बांदी कूश जंक्शनची आहे. आश्रम एक्सप्रेसचे चीफ लोको इन्स्पेक्टर संतोषने आपले नातेवाईक सुखरामला लोको केबिनमध्ये बसवलं. त्याचं तिकीट कन्फर्म नव्हत, म्हणून त्यांना लोको केबिनमध्ये बसवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ट्रेनच्या जंक्शनहून रवाना होताना सुखरामने  केबिनमधून फेसबुक लाइव्ह केलं. स्वत: ट्रेन चालवतअसल्याचा दावा करीत तो लाइव्ह करीत होता. या व्हिडीओमध्ये तो केबिनमधील उपकरणांशी छेडछाड करीत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी ट्रेनमध्ये 800 हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.

जयपूर विभागाचे डीआरएम नरेंद्र यांनी सांगितले की, तपासात हे प्रकरण बांदीकुई ते दिल्ली दरम्यानचे असल्याचे आढळून आले. जयपूर विभागीय रेल्वेने मुख्य लोको निरीक्षक संतोष, लोको पायलट प्रदीप मीना आणि असिस्टंट लोको पायलट मनीष यांना तत्काळ निलंबित केले आहे. इंजिनमध्ये बसलेला सुखराम आता दिल्लीला पोहोचला आहे. त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी एका समितीचं गठण करण्यात आलं आहे. अशा प्रकारे प्रवास करणं धोक्याचं आहे.

Post a Comment

0 Comments