या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहा मृतक हे कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसही दाखल झाले. यानंतर मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू झालं.
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला होता. भरधाव गाडी थेट एका झाडाला जाऊन धडकली होती. हा अपघात इतका भीषण होता की त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर तिघांचा हुबळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जोगिया ठाणे परिसरातील कटया गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला वऱ्हाडींनी भरलेल्या बोलेरोने जोरदार धडक दिली. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
ही बोलेरो बांसी कोतवाली क्षेत्राच्या महुवआ गावातील एका लग्नातून परतत होते. हे वऱ्हाड शोहरातगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महला गावातील होते. लग्नानंतर ते शनिवारी रात्रीच्या सुमारास परतत होते. यावेळी गाडीत चालकासह 11 जण होते. जोगिया ठाणे परिसरातील कटया गावाजवळ पोहोचल्यावर बोलेरोने ट्रेलरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तब्बल 8 जणांचा यात मृत्यू झाला. गंगा गौड नावाच्या व्यक्तिच्या मुलाच्या लग्नाहून हे सर्वजण परतत होते. मात्र, रस्त्यातच भीषण अपघात झाला.
0 Comments