पोलिसांनी सांगितले आहे की, या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचे वय जवळपास 10 ते 11 वर्ष आहे. पीडित मुलीने आपल्या परिवाराला सांगितल्यानंतर नुकतीच याबद्दल तक्रार दाखल केल्याची पोलिसांनी सांगितले. यानंतर चारही आरोपींविरोधात रविवार संध्याकाळी पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचे तपास अधिकारी कमलेश कुमारी यांनी सोमवारी सांगितले की, चारही संशयितांनी मागील एका वर्षात अनेकवेळा या चिमुरडीसोबत दुष्कृत्य केले. यानंतर तीन संशयितांना येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर 14 वर्षाचा आरोपी अजूनही फरार आहे. त्याला पकडण्यासाठी संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
0 Comments