बीडमध्ये (beed) काही महिन्यांपूर्वी एका मुलीवर सामूहिक बलात्काराच्या (beed gang rape case) धक्कादायक घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला होता. आता लातूरमध्येही (latur) एका अल्पवयीन मुलीसोबत लाजीरवाणी घटना समोर आली आहे. फक्त 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला देहविक्री करायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या पीडितेवर अनेकांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी 09 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात फक्त 500 रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला चक्क देहविक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका महिलेने तिला ड्रेस आणि सॅंडल विकत घेऊन दिली होती. काही दिवसानंतर 'ड्रेस आणि सॅंडलचे 500 रुपये दे नाहीतर आम्ही सांगेन ते कर' असा दबाव त्या महिलांनी टाकला आणि इथून तिचा वाईट हेतूने वापर करून घेण्यात आला.
लातूर शहर हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय नावाजलेलं शहर आहे. त्यामुळे अशा घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झालंय. या घटनेतील आरोपीना पोलिसांनी तात्काळ अटक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व पीडितेला न्याय द्यावा, तसंच आरोपींना कठोर शासन करावं अशी मागणी लातूरकरांनी केली आहे.
0 Comments