एका महिलेने दुसऱ्या महिलेवर बलात्कार करण्यासाठी 5 लोकांना हायर केलं. जेणेकरून ती त्या महिलेवर बलात्कार करवून घेऊ शकेल, जिचे आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा तिला संशय होता.
इथे एका महिलेने दुसऱ्या महिलेवर बलात्कार करण्यासाठी 5 लोकांना हायर केलं. जेणेकरून ती त्या महिलेवर बलात्कार करवून घेऊ शकेल, जिचे आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा तिला संशय होता.
पोलिसांनी आरोपी महिला गायत्रीसह 6 जणांना अटक केली आहे. कोंडापूर येथील गायत्रीच्या घरात ५ जणांनी महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्रीचा पती श्रीकांत पीडितेला यूपीएससीच्या तयारीदरम्यान कोचिंगमध्ये भेटला होता.
पीडिता अनेकदा गायत्रीच्या पतीला भेटण्यासाठी गायत्रीच्या घरी येत असे. यानंतर ती ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत गायत्रीसोबत तिच्याच घरी राहिली. पुढे गायत्रीला संशय आला की तिच्या पतीचे महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. बराच वाद झाल्यानंतर महिलेनं गायत्रीचं घर सोडलं.
आरोप आहे की, 26 मे रोजी गायत्रीने पीडितेला तिच्या घरी बोलावलं. इथे गायत्रीने आधीच पैसे देऊन लोकांना बोलावून घेतलं होतं. यानंतर पीडितेवर बलात्कार करण्यात आला. त्याचा व्हिडिओही बनवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसात गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन पीडितेला सोडून देण्यात आलं. दुसरीकडे पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
0 Comments