-->

Ads

मुंबईतल्या हायफाय भागात ब्रिटिश महिलेचा विनयभंग, 35 वर्षीय आरोपी अटकेत

 


मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मुंबईच्या वांद्रे (British woman) परिसरात ब्रिटिश महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

मुंबईच्या वांद्रे परिसरात ब्रिटिश महिलेचा विनयभंग झाला आहे. या प्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिटिश महिला यार्ट क्लब वांद्रे येथे पतीसोबत होती. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास ती त्या क्लबमध्ये होती. त्यावेळी आरोपी घनश्याम यादव यानं महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता.

यानंतर पीडित महिलेनं त्याच्याकडे अनेकदा दुर्लक्षही केलं. त्यानंतर महिलेनं त्याच्या या वारंवार कृतीला कंटाळून तिनं त्याला समजही दिली. मात्र त्यानंतरही तो तसंच गैरकृत्य करत राहिला.

समज दिल्यानंतरही आरोपी यादव वारंवार गैरकृत्य करत असल्यानं महिलेनं त्याला जाब विचारत पोलिसांना पाचरण केलं.

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी 354(ए),1, आय, 354, 509 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवत घनश्यान यादव याला अटक केली असून अधिक तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments