-->

Ads

3 IPL टीमकडून खेळलेल्या भारतीय खेळाडूवर गुन्हा दाखल, गंभीर आरोपांची होणार चौकशी


 दिल्ली, कोलकाता आणि बँगलोर या आयपीएल टीमकडून खेळलेला आणि टीम इंडियाच्या अंडर 19 टीमचा माजी सदस्य असलेल्या हरप्रीत सिंह भाटीया (Harpreet Singh Bhatia) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हरप्रीत सध्या छत्तीसगड रणजी क्रिकेट टीमचा प्रमुख सदस्य आहे. रायपूरमधील पोलास स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दखल झाला असून यामध्ये त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

हरप्रीतवर नोकरी मिळवण्यासाठी बनावट मार्कशीटचा वापर केल्याचा आरोप आहे. भारतीय लेखा परीक्षा विभागानं त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हरप्रीतनं 2014 साली क्रिकेटच्या कोट्यातून लेखा परीक्षक, लेखपाल पदासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या वेळी त्याच्याकडून योग्य शैक्षणिक प्रमाणपत्र मागण्यात आले होते. हरप्रीतची या पदासाठी निवड देखील झाली. त्यानंतर त्याच्याकडे मुळ प्रमापण मागण्यात आले.

या कार्यलयाकडून निवड झालेल्या सर्व उमेदवारांच्या शैक्षणकिक योग्यता प्रमाणपत्राची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये हरप्रीतनं सादर केलेली बुंदेलखंड विद्यापीठाची डिग्री बनावट असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हरप्रीत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स या आयपीएल टीमचा सदस्य होता. त्याच्या नावावर 71 टी20 सामन्यात 2006 रन असून यामध्ये 15 अर्धशतकांची नोंद आहे. त्याचबरोबर त्यानं 70 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 47.75 च्या सरासरीनं 4489 रन केले असून 14 शतक आणि 12 अर्धशतक झळकावली आहेत.

Post a Comment

0 Comments