धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेबाबत मुलींनी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सांगितले तेव्हा त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा (Students Molested in MCD School) प्रयत्न केला. त्यांनी या मुलींना हे सगळं विसरून जा असं सांगितल्याचा आरोप मालिवाल यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, 'शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली नाही, त्यामुळे त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी.' TV9 हिंदीने याविषयी वृत्त दिले आहे.
दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याची नोटीस दिली आहे. याप्रकरणी माजी एमडीसी आयुक्तांना (MCD Commissioner) महिला आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. एक अज्ञात व्यक्ती शाळेत प्रवेश कशी करू शकते? शाळांमध्ये आणि परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काय झाले? असे प्रश्न महिला आयोगाने उपस्थित केले आहेत.
पोलिसांकडून तपासासाठी विशेष पथक
डीसीपी संजय सेन यांनी सांगितले, की आम्ही या प्रकरणाचा (MCD School students stripped) तातडीने तपास सुरू केला आहे. या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता. मात्र, आम्ही आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहोत. आम्ही विद्यार्थिनींचा जवाब नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे स्केच तयार करण्यात आले आहे. याच्या मदतीने दोन संशयीतांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याचे संजय यांनी सांगितले.
पोलिसांचे पथक शाळेतील अधिकाऱ्यांसोबत मिळून तपास करत आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, असंही संजय यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आपल्या मुली आता शाळेतही सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न हे पालक उपस्थित करत आहेत.
0 Comments