-->

Ads

गोहत्येच्या संशयावरून जमावाने केली 2 आदिवासींची हत्या; काय आहे संपूर्ण प्रकरण?

 


 मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात गोहत्येच्या (Cow Slaughter) संशयावरून 15-20 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. यात दोन आदिवासींचा मृत्यू (Trible Death) झाल्याचे समोर आले आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि भाजपशासित राज्यातील विरोधी काँग्रेसने हल्लेखोर बजरंग दलाचे असल्याचा आरोप केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुरई पोलीस ठाणे हद्दीतील सिमरिया येथे सोमवारी पहाटे 2.30 ते 3 च्या दरम्यान घडलेल्या या घटनेच्या संदर्भात सुमारे 20 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर काँग्रेस आमदार अर्जुनसिंग काकोदिया यांच्या नेतृत्वाखालील गटाने जबलपूर-नागपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे सिवनीचे पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस.के. मारावी यांनी माध्यमांना सांगितले की, "दोन आदिवासींचा मृत्यू झाला आहे. 15-20 जणांच्या टोळक्याने पीडितांच्या घरी जाऊन गाय मारल्याचा आरोप करत त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे."

मारावी यांनी सांगितले की, कुराई ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून आरोपींचा शोध सुरू आहे. तक्रारीत काही आरोपींची नावे आहेत. तर काही अज्ञात आहेत. आम्ही दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडितांच्या घरातून सुमारे 12 किलो मांस सापडले आहे. या घटनेत जखमी झालेले फिर्यादी ब्रजेश बत्ती याने सांगितले की, जमावाने सागर येथील रहिवासी संपत बत्ती आणि सिमरिया येथील धनसा यांना काठ्यांनी मारहाण केली. तो जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा त्याच्यासोबतही मारहाण करण्यात आली.

या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन करणारे काँग्रेस आमदार काकोदिया यांनी दावा केला आहे की, हल्लेखोरांमध्ये बजरंग दलाच्या सदस्यांचा समावेश असून त्यांनी या उजव्या विचारसरणीच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, पीडितांच्या नातेवाईकांना एक-एक कोटी रुपये आणि सरकारी नोकरी द्यायला हवी. तसेच याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी ट्विट केले की, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी आणि जखमी तरुणांच्या उपचाराची संपूर्ण व्यवस्था शासकीय खर्चाने करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments