-->

Ads

प्रेमात वेडा झालेल्या तरुणाची वेदनादायी Love Story; Whatsapp Status वर प्रेयसीचा फोटो ठेवला अन्...


  राजस्थानमधील (Rajasthan News) जैसलमेरमधून एक लव्ह स्टोरीचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात प्रियकराने मृत्यूपूर्वी प्रेयसीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर अपलोड केला.

या जिल्ह्यात एका 19 वर्षीय मुलाने आपल्या प्रेयसीवर नाराज होऊन आत्महत्या केली. आणि मृत्यूप्रीव मोबाइल व्हॉट्सअप स्टेटसवर प्रेयसीचा फोटो अपलोड केला. ज्यात मृत तरुणाने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, हिच्यासाठी मी आत्महत्या करीत आहे. ज्याच्या काही वेळानंतर प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, जेसलमेर जिल्ह्यातील जीवराजगडमध्ये राहणारा 19 वर्षीय अर्डुनने रात्री उशिरा घराजवळील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, अर्जुनने मृत्यूपूर्वी प्रेयसीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, मी हिच्यासाठी आत्महत्या करीत आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. मोबाइल कॉल डिटेल्सच्या आधारावर तपास सुरू आहे. ज्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण समोर येईल.

Post a Comment

0 Comments