ऊमरखेड प्रतिनिधी - संजय जाधव
कला ही माणसाला जीवन जगायला शिकवते. जीवन तर सगळेच जगत असतात मात्र जगायचे कसे हे कलेमुळे कळते. तसाच नृत्य कलेसाठी आपले सर्वस्वी अर्पण करून तन-मन-धनाने नटेश्वरा ची साधना करणारा एक अवलिया म्हणजे अंबादास धुळे.
मूळचा नागपूरचा असलेला अंबादासला लहानपणापासूनच नाट्यकलेची आवड होती. थोडीशी स्त्री सारखी लकब असल्याने महाविद्यालयात, शाळेत मित्र त्याला चिडवत असे. मात्र त्याने त्या चिडवण्याचा कधीही राग मानला नाही. आपल्यातले दोष हेरून आणि त्याची भांडवल करून त्याने आपली कला जोपासण्याचे ठरवले.
महाविद्यालयीन शिक्षण बिटरगाव येथे केल्यानंतर त्याने थेट नागपूर गाठून नृत्य कलेचे प्रशिक्षण घेतले. व तो वेगवेगळ्या स्पर्धा गाजवू लागला. हुबेहूब एखाद्या स्त्रीसारखी लावणीसादर केल्यानंतर अक्षरशा प्रेक्षकांना सुद्धा भुरळ पडत असे. टीव्हीवर येणाऱ्या वेगवेगळ्या डान्सिंग फ्रॉम मध्ये सुद्धा अंबादास ने आपले कलेचे प्रदर्शन केले आहे. आज पावेतो त्याच्या नृत्य कलेमुळे त्याला समाजात भरपूर मानसन्मान मिळाला. वेगळ्या संस्थेने त्याला पुरस्कार सन्मानपत्र देऊन त्याचा यथोचित सन्मान केला. हे सगळे फक्त त्याच्या अंगी असलेल्या नृत्य कलेमुळे झाले असे अंबादास अभिमानाने सांगतो. समाजामध्ये वावरत असताना काही लोकांनी त्याला प्रचंड मानसिक त्रास दिला मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपले ध्येय गाठले. एखाद्या स्त्री सारखी त्याची हालचाल असल्याने त्याला या समाजाने तोडून बोलले पण त्याला कधी त्या गोष्टीचा राग आला नाही. आणि त्यामुळेच हसतोय ते यशस्वी नृत्य कलाकार झाला. आज त्याने स्वतःचे डान्सिंग स्कूल सुरू केले असून गरीब होतकरू मुलांना तो मोफत नृत्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या पंखांना बळ देतोय. अंबादास यांनी या संघर्षमय जीवनातून आपला यशाचा मार्ग निवडला आणि आपले ध्येय गाठले. आज समाजातील अशा असंख्य अंबादास यांनी अंबादास धुळे यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.
0 Comments