अंबरनाथच्या कमलाकर नगर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकावर रविवारी दुपारच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. कमरुद्दीन खान असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे.
खान यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून दोन राउंड फायर करण्यात आल्या होत्या, मात्र सुदैवानं यात ते थोडक्यात बचावले आहेत. जागेच्या वादातून नियाज सिद्दीकी यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय कमरुद्दीन खान यांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात आर्म एक्ट आणि कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. कमरुद्दीन हे जमियात या कॉ-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास ते सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसले होते. याच वेळी ऑफिसच्या खिडकीमधून त्यांच्यावर बंदूकीतून दोन राउंड फायर करण्यात आल्या. मात्र या दोन्ही गोळ्या भिंतीमध्ये घुसल्याने कमरुद्दीन हे थोडक्यात बचावले. जागेच्या वादातून हा सगळा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र हल्लेखोर कोण होते आणि त्याचा यामागचा उद्देश काय होता हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज आणि जुना वाद याची चौकशी करून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी सांगितले.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments