लग्न ही नवरा-नवरीसह घरच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असते. पण नवरीला घेऊन निघालेला नवरा घरी न पोहोचता थेट त्याचं तुरुंगात स्वागत झालं तर? असंच एका तरुणासोबत घडलं आणि त्याला घरी आनंदोत्सव न करता पोलिसांचा पाहुणचार स्वीकारावा लागला. या तरुणाच्या प्रेयसीनंच त्याला चांगला धडा शिकवला.
या तरुणाचे एका 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्न करण्याचं वचन देत आरोपी राजकुमार तिच्यासोबत संबंध ठेवायचा. तो बलात्कार करत असल्याचं या तरुणीचं म्हणणं आहे. आता त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. यामुळे चिडलेली प्रेयसी थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. मध्य प्रदेशातील रीवा येथील हा प्रकार आहे. मुलीने सांगितलं की, तिला राजकुमारच्या लग्नाची माहितीही नव्हती. घडलेल्या प्रकाराची अचानक माहिती मिळताच तरुणीने पोलिस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार केली.
या तरुणाने आपल्यासह जिच्याशी लग्न केलं त्या मुलीलाही फसवलं असल्याचा आरोप त्याच्या प्रेयसीने केला आहे. त्याने प्रेयसीला फसवून गुपचूप दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. प्रियकराच्या लग्नाची माहिती मिळताच तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी वराला त्याच्या घरी पोहोचल्यानंतर अटक केली आहे. हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील साकेतचं आहे. आरोपी वर नुकताच लग्न करून परतला होता. लग्नानंतर लगेचच पोलिसांनी तिला अटक केली. नवऱ्या मुलाला अटक करण्याचं कारण कळल्यानंतर नव्या नवरीला अक्षरशः रडू कोसळलं.
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, साकेत सुरसा पोलीस स्टेशन, रायपूर करचुलियन येथील रहिवासी असलेल्या राजकुमारचे 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाच्या बहाण्याने राजकुमारवर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तरुणीने सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून राजकुमार तिला लग्नाच्या बहाण्याने रीवा येथील युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशन परिसरात घेऊन यायचा. तिला येथे आणून आरोपी तिच्यावर बलात्कार करायचा. यानंतर आता दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.
नुकताच लग्नाचा आनंद साजरा करून घरी परतलेला राजकुमार आता लॉकअपमध्ये पोहोचला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर त्यांनी राजकुमाराच्या घरी जाऊन त्याला अटक केली. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणीही केली आहे.
राजकुमारच्या अटकेनंतर त्याच्या घरात शांतता आहे. कालपर्यंत ज्या घरात लग्नाचा आनंद साजरा होत होता, तिथे आता शांतता आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर राजकुमारला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
0 Comments