-->

Ads

Aurangabad robbery: औरंगाबाद जिल्ह्यात देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा, सिग्नलला कापड बांधून एक्सप्रेसवर दगडफेक करत केली लूट

  


देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा (Robbery on Devgiri Express) पडल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ (Potul Railway station) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. औरंगाबादहून मुंबईकडे देवगिरी एक्सप्रेस येत होती. रात्री साधारणत: 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं वृत्त समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने देवगिरी एक्सप्रेस निघाली होती. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सिग्नलला कापड बांधून ठेवले होते. त्याच दरम्यान दरोडेखोरांनी एक्सप्रेसवर जोरदार दगडफेक सुद्धा केली. एक्सप्रेस थांबताच 5 नंबरच्या डब्यापासून 9 नंबरच्या डब्यापर्यंत दरोडेखोरांनी दरोडा टाकला असल्याची माहिती मिळाली आहे.यावेळी दरोडेखोरांनी एक्सप्रेसमधील प्रवाशांचे सोन्याचे दागिने, पैसे, मोबाइल चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आपला तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोर हे रुग्णवाहिकेतून आले असल्याची माहिती कळत आहे. रुग्णवाहिका रेल्वे ट्रॅकजवळ उभी होती असं बोललं जात आहे. या घटनेनंतर एक्सप्रेस पुन्हा रवाना करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात कर्जतमध्ये असाच प्रकार घडला होता. मात्र, या घटनेची माहिती सतर्क प्रवाशांनी जीआरपीला दिली आणि पोलिसांनी या दरोडेखोरांचा डाव उधळून लावला.

लांबपल्ल्याच्या मेल एक्स्प्रेसमध्ये लूटपाट करणाऱ्या टोळीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली. पुण्यात राहणाऱ्या या टोळीने कर्जतमध्ये धावत्या रेल्वेत घुसून लुटमार सुरू केली होती. पण, सतर्क प्रवाशांमुळे या टोळीचा डाव उधळला गेला. धक्कादायक म्हणजे, यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटत असताना काही प्रवाशांनी सतर्कता दाखवत 100 नंबरवर फोन करत याची माहिती दिली. त्यानंतर कल्याण जीआरपी आणि आरपीएफला मिळाली. त्यानुसार, ड्युटीवर असलेले आरपीएफ जवानाने त्वरीत सापळा रचत लुटरूच्या पाच जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. तबरेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख अशी अटक करण्यात आलेल्या लुटारुंची नावे आहेत. या लुटारुंच्या टोळीत एक चौदा वर्षाचा अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments