-->

Ads

औषध आणायला बाहेर पडली अन् परतलीच नाही; प्रियकरासह आढळला 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह, काय घडलं?


प्रेमी युगुलावर गोळ्या झाडून त्यांची हत्या (murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हरदोई जिल्ह्यातील बिलगाव (bilgaon) येथे घडली.

बिलगावातील मोहल्ला रफायत गंज येथील रहिवासी झाकीर यांची २६ वर्षीय मुलगी तबस्सुम उर्फ ​​मुन्नी ही शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तापाचे औषध घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने तिचा शोध सुरू झाला.दरम्यान, दुपारी शहरातील सदर बाजार येथील जुन्या सीएचसीमध्ये दोन रक्ताने माखलेले मृतदेह सापडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी, एएसपी पूर्वी अनिल कुमार यादव, जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्यासोबत फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली. तपासादरम्यान, मृतदेहाची ओळख पटली आहे. हे मृतदेह तबस्सुम उर्फ मुन्नी आणि रमेश राठोड या 27 वर्षीय तरुणाचा आहे. तर घटनास्थळी एक पिस्तूलही सापडले आहे. असे सांगण्यात येत आहे की, या दोघांची हत्या करण्यात आली आहे. मात्र, ही आत्महत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच याबाबत खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments