-->

Ads

क्रांती दिनाचे औचित्य साधून अमडापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश


आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून  साई मंदीर आमडापुर  येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने क्रांती दिन साजरा करण्यात आला... 

क्रांती दिनाचे औचित्य साधून अमडापुर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंकज मुडे जिल्हा परिषद सदस्य निगनुर शंकर जाधव अविनाश जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमरखेड राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष बबलू राठोड पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला

ऊमरखेड:- प्रतिनिधी संजय जाधव


आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय. 

आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. 

त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी-व्यवसायात आणि निवडणुकी साटी उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या आहेत.भारतात ९ ऑगस्ट या दिवशी आदिवासी क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो 

याचे औचित्य साधून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अमडापूर येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी क्रांती दिन आज साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे तालुका अध्यक्ष बबलू राठोड यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या कार्यावर  मार्गदर्शन केले व शंकर जाधव सामाजीक कार्यकर्त यांनी आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचा व गावाचा विकास कसा करता येईल आपण आपल्या गावातील समस्या




 आरोग्य सांड पाण्याचे व्यवस्थापन राशन कार्ड च्या विषयी तक्रारी जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दळणवळण यासाठी लागणाऱ्या रस्त्याविषयी अडीअडचणीला कार्यकर्त्याला त्याने आव्हान केलं मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी आपल्या बंदी भागाच्या गावाच्या विकासासाठी लोक कल्याणया साठी मी सदैव तत्पर आहे असे मनोगत शंकर जाधव यांनी व्यक्त केले पंकज मुडे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या  प्रतिमेचे पूजन निंगणुर जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे, अविनाश जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमरखेड, शंकर जाधव सामाजिक कार्यकर्ते,बबन आडे , बीबीचंद राठोड ,कैलास दुमारे ,दिलीप जाधव ,उपसरपंच टाकळी उमेश जाधव व शेकडो  कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments