मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार, काळी (दौ) ते पुसद मार्गावरील मोरवाडी फाटा रस्ताच्या लगत काळी दौ. वनपरिक्षेत्र जंगल आहे.या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल अकरा सांड बैलांची मृतदेह आढळून आला.परीसरातील नागरीकांना दुर्गंधी येत असल्याने नागरीकांनी पाहणी केली,तर एका पाठोपाठ सलग ११ बैल मृत अवस्थेत आढळून आले.
यातील काही मृत जनावरांच्या अंगावर, गळ्यावर जखमा, तसेच पाय बांधलेले असल्याने त्या जनावरांची हत्या करण्यात आली असावी असे प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे.
तसेच बैलांच्या पोटावर सुध्दा तीक्ष्ण हत्यारांने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हि जनावरे परिसरातील नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ही जनावरे इतरत्र ठिकाणावरून आणून हे हत्याकांड घडवल्या गेले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टिम, पोलीस प्रशासन घटना स्थळी पोहचले.वृत लिहोस्तर पंचनामा करण्यात आला नव्हता.
सदर घटनेची माहिती मिळताच पंचनामा करण्यात आला आहे.११ मृत बैला बाबत घटनेची फिर्याद पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन ला देण्यात आली असून पोलिसांचा फौजफाटा घटनस्थळी जावून आला आहे.दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पवार यांनी दिली
उमरखेड प्रतिनिधी- संजय जाधव
0 Comments