उमरखेड प्रतिनिधी : संजय जाधव
उमरखेड तालुक्यात दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने ढाणकी परिसरातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत. पुलावरून देखील पाणी वाहत असताना असाच ढाणकी मेट रोडवरील नाल्याच्या पुरात एक परप्रांतीय व्यक्ति आज वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहिती नुसार त्या इसमाचे नाव राजा सिंग असल्याचे कळते. तो एका कंटेनर वर क्लीनर म्हणून काम करत होता. काल रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने सदर नाल्याला पूर आला असून पुलाचे बांधकाम सुद्धा अर्धवट झालेले आहे. सदर इसमाला मेट वरून ढाणकी कडे यायचे होते. पाणी कमी होण्याचा अंदाज दिसत नसल्याने त्याने पाण्यातून येण्याचा प्रयन्त केला मात्र पूल तुटलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो वाहून जाऊ लागला. तेथे असलेल्या नागरिकांनी त्याला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला मात्र तो वाहत्या पाण्यात सापडला नाही. सदर पुलाचे बांधकाम हे रुद्रायणी कंट्रक्शन कंपनी यांच्यामार्फत अतिशय संथ गतीने होत असून या आधी सुद्धा हा पूल वाहून गेला होता. आज या पुलाने एक बळी घेतला असून अजून किती बळी गेल्यावर हा पूल तयार होईल हे देवाचं जाणो. तूर्तास या घटने मुळे नागरिक संतापले असून पुलाचे बांधकाम तातडीने करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे
0 Comments