-->

Ads

रजेसाठी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यावर गुन्हा दाखल.. अंबरनाथ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप..



        अंबरनाथ : आपली रजा मंजूर होण्यासाठी बनावट व बोगस कागदपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याचा डाव उघडा पडला असून या प्रकरणी सदर कर्मचाऱ्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पंचायत समिती कार्यालयात कैलास पांडुरंग चव्हाण हा कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहे. चव्हाण हा 1 डिसेंबर 2017 ते 20 जानेवारी 2021 पर्यंत रजेचा अर्ज न करता अथवा कोणतेही कारण न देता गैरहजर राहिला होता. त्याला कार्यालयातून याबाबत विचारले असता त्याने आजारपणाचे खोटे कारण सांगितले आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अधिकारी एस. जे. खरे यांच्याकडे जिल्हा रुग्णालय, ठाणे येथून शल्य चिकित्सक डॉक्टरचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. त्यानंतर चव्हाण याने वैद्यकीय रजा मंजूर झाल्याचे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव प्रकाश वळवी यांच्या नावाने बनावट सही-शिक्का असलेले प्रमाणपत्र ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांना सादर केले. कैलास चव्हाण याची हेराफेरी उघडकीस येताच पंचायत समितीचे अधिकारी प्रकाश सांबरे यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात कैलास चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार केली. या प्रकरणी कैलास चव्हाण यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments