-->

Ads

भारत की आजादी का अमृत महोत्सव सम्राट महिला ग्राम संघ नारळी येथे मोठ्या उत्साहात साजरा


उमरखेड प्रतिनिधी संजय जाधव

उमरखेड तालुक्यातील आदर्श ग्राम मधून ओळखल्या जाणाऱ्या नारळी येथे पंतप्रधान यांच्या अहवालाला प्रतिसाद देत भारत की आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात नारळी येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली 

  स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत माहे मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ या ७५ आठवड्यांच्या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानुसार दि. ०१. ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत मा. पंतप्रधान, दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी दु. १२.३० वाजता देशातील सर्व राज्यातील NRLM) अभियाना अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक संघ, उत्पादक गट  

 . दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी दु. १२.३० वाजता मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्या NRLM अभियानातील महिला सोबत मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन संवाद साधण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चे गट समन्वयक सत्यम सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आदर्श ग्राम नारळी चे सरपंच संजय बर्डे उपसरपंच बीबीचंद राठोड अविनाश जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड नारळी येथील मनोज जाधव सम्राट ग्रामसंघ नारळीचे अध्यक्ष अंजली विशंभर जाधव कोषाध्यक्ष शारदा फरताडे सचिव आशा मकळे ज्ञानेश्वरी जटाळे आयसीआरपी रेवती थिटे अश्विनी मकळे निशा राठोड राजश्री आडे व शेकडो महिला  नी उपस्थिती दर्शवली होती

Post a Comment

0 Comments