संजय जाधव प्रतिनिधी
येथील प्रा.आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांची नुकतीच प्रशासकीय बदली झाली आहे. डॉ. नखाते यांच्या बदलीमुळे फुलसावंगी येथील आरोग्य सेवा कोलमडुन आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील डॉक्टराची बदली रद्द केली नाही तर, जनआंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथे जि.प.चे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जिल्हात सर्वाधिक बाह्य रूग्ण तपासणी व प्रसूती या आरोग्य केंद्रात होतात. महागाव सह उमरखेड, किनवट व माहुर तालुक्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. अतिशय व्यस्त असलेल्या या आरोग्य केंद्रात ३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. मात्र मागील २ वर्षा पासुन येथील आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्याही अधिकाऱ्याची प्रशासकीय बदली झाल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडली जाणार आहे.
येथील आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र मातामृत्यू प्रकरणात येथील एका आरोग्य अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी पाठविण्यात आले. मात्र येथुन कार्यमुक्त केले नसल्याने येथे वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त दिसत नाही.मात्र येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.
या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांची कोराना काळात महागाव येथील कोविड सेंटरवर नियुक्ती करण्यात आली होती. तेथे त्यांची वैद्यकीय सेवा उत्तम राहिली आहे. येथील आरोग्य केंद्रात सुद्धा त्यांची कार्यपद्धत अतिषय चांगली आहे.त्यामुळे त्यांच्या बदलीचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी फुलसावंगी परिसरातील नागरीकांकडुन करण्यात येत आहे.
***************
येथील प्राथमिक मराठी शाळेत ८ शिक्षक कार्यरत होते. प्रशासकीय बदलीमध्ये येथील ५ शिक्षक गेले. ५ शिक्षक गेल्यानंतर शासनाने येथे नविन एकही शिक्षक दिला नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली शाळा आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुद्धा हिच गत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने येथुन जितक्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या बदल्या केल्या, तीतक्या कर्मचाऱ्यांच्या जागा प्रथम भरण्यात याव्यात. नंतरच येथील आरोग्य कर्मचाऱ्याच्या बदल्या कराव्यात.
शमशेर खान
सामाजिक कार्यकर्ता,फुलसावंगी
0 Comments