लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेची ना हरकत प्रमाणपत्र मिळनेबाबत
उमरखेड{ प्रतिनिधी संजय जाधव }
उमरखेड तालुक्यातील खरूस बु येथील मातंग समाज बांधवनी डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेसाठी NOC ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अर्ज सादर केला होता परंतु त्या अर्जावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्यापर्यंत कोणतेही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे खरुस बु येथील अमोलदादा सूर्यवंशी, देविदास परशराम काळे,सचिन सूर्यवंशी,समाधान काळे यांनी वैतागुन आज दि 23 ऑगष्ट पासुन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषण कर्त्या समाज बांधवांची काही जिवीत हाणी किंवा अनुचित प्रकार झाल्यास त्यची संपुर्ण जबाबदारी ग्रा. प. कार्यालय प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी यांची राहील. असे ह्यावेळी उपोषण कर्त्यांनी म्हटले आहे.
वरील संदर्भीय 3 दिवसात योग्य निर्णय न झाल्यास खरुस बु मातंग भगीनी पंचायत समिती कार्यालय उमरखेड येथे आमरण उपोषण करणार असा इशारा सुद्धा ह्यावेळी देण्यात आला आहे.
0 Comments