-->

Ads

ग्रामपंचायत कार्यालय मेट येथे 75 वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा




उमरखेड :- प्रतिनिधी संजय जाधव

उमरखेड तालुक्यातील जवानाचा गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट  येथे आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मेट जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मेट येथे झेंडा वंदनाचा राष्ट्रीय अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी गावचे देशाची सेवा करून देश सेवेमधून  निवृत्त झालेले जवान श्री उत्‍तम राठोड जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष राठोड माजी सेवानिवृत्त सैनिक इंदल मोतीराम राठोड माजी सैनिक  प्रथम नागरिक तथा सरपंच सौ प्रणिता विक्रम राठोड विक्रम राठोड युवा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ 

तसेच सचिव श्री. प्रकाश मानसिंग राठोड  यांच्या हस्ते राष्ट्रीय महापुरुषयांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तसेच ग्रामपंचायत कार्यालय मेट येथील ध्वजारोहण गावातील सेवानिवृत्त सैनिक उत्तम मोहनसिंग राठोड  यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.  तसेच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मेट येथील ध्वजारोहण  माजी सैनिक सुभाष श्रावण सिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य गण व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे  मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी,  आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम व सोशल डिस्टन्स पाळून हा राष्ट्रीय कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय  मेट येथे पार पाडण्यात आला.

Post a Comment

0 Comments