दरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा "एक जवान,एक वृक्ष" हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील जवानांनी संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात सोबतच शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी व माळावर वड,पिंपळ,कडूनिंब,उंबर,सीताफळ,करंज, इ. उपयोगी वृक्षांची लागवड केली.
TDRF द्वारा राबवित असलेल्या "एक जवान,एक वृक्ष" या उपक्रमाच्या माध्यमातून उमरखेड मध्येच नाही तर विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील(तालुक्यांमधील) सर्व अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही अशा माळावर विविध उपयोगी वृक्ष लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन त्याची निगा राखण्याचे संकल्प घेतले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस कार्यरत होते. सोबतच उमरखेड कंपनीचे कंपनी कमांडर सूरज सूर्यवंशी, हर्षद पाईकराव, कंपनी ड्रील इंस्ट्रकटर सौरभ हरण, अनिकेत सूर्यवंशी, ओंकार देवकते,ओंकार पानोळे, योगिता भालेराव, कंपनी सेक्शन कमांडर ज्ञानेश्वर हिंगादे, अश्विनी साखरे, त्रिषाला शिरगरे, प्रतीक्षा येरावार इ. जवानांनी विशेष कार्य केले.
0 Comments