दहावीच्या निकालाच्या वेबसाईट दोन्ही डाऊन
Maharashtra SSC Result 2021 Declared LIVE Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in/ आणि https://mahahsscboard.in/ या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता पाहायला मिळेल.
Maharashtra SSC Result 2021 LIVE Updates मुंबई : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दोन्ही साईट डाऊन झाल्या आहेत. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली. सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
राज्यात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण
- एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण
- राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
- श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार
- मुलांचा निकाल 99.94 टक्के,
- मुलींचा निकाल 99.96 टक्के
- 12 384 शाळांचा निकाल 100%
- 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे
957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के
83262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 22384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
LIVE NEWS & UPDATES
Maharashtra SSC Result 2021Declared: दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईटस डाऊन
सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, दहावीच्या निकालाच्या दोन्ही साईटस डाऊन झाल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे.
सीईटीच्या परीक्षेची तारीख लवकरचं जाहीर करणार: दिनकर पाटील
अकरावीसाठी सीईटी शासनानं जाहीर केली आहे. सीईटीच्या परीक्षेची तारीख लवकरचं जाहीर करु, सीईटी घेण्याचे आदेश राज्य मंडळाला मिळाले आहेत. न्यायालयात काही पेंडिंग नाही. आम्ही त्याचं वेळापत्रक तयार करत आहोत आणि पुढे जाणार आहे. ही परीक्षा वैकल्पिक ठेवली आहे. जे विद्यार्थी सीईटी देऊ इच्छितात त्यांच्यासाठी पोर्टल सुरु करु, असं दिनकर पाटील म्हणाले. सीईटीची डेडलाईन 21 ऑगस्ट पर्यंत जाईल. सीईटीसंदर्भात बोर्डाकडून लवकरच नोटिफिकेशन जारी केलं जाईल.
अनेक भाषा आहेत पण इंग्रजी हा विषय सर्व बोर्डांसाठी असतो. इंग्रजी हा विषय सगळीकडे सारखा असतो. इंग्रजीचं व्याकरण सगळीकडं सारखं असतं. दहावीपर्यंत इंग्रजी ही दुसरी भाषा असते, असंही दिनकर पाटील म्हणाले.957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के
83262 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 12384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
राज्यात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण
दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.
दहावीच्या निकालात मुलींची बाजी
दरवर्षी प्रमाणं यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 99.94 टक्के तर मुलींचा निकाल 99.96 टक्के लागला आहे.
12 384 शाळांचा निकाल 100% लागला आहे. तर, 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यांचा निकाल नंतर जाहीर करण्यात येणार आहे
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के
दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे. तर, 27 विषयांचा निकाल 1०० टक्के लागला आहे, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.
दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 99.95: दिनकर पाटील
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं परीक्षा रद्द कराव्या लागल्या. 28 मे रोजी अंतर्गत मूल्यमापनाचं सूत्र ठरलं. त्या आधारे सर्व शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचे गुण राज्य मंडळाच्या पोर्टल वर भरला. त्यानंतर मंडळानं निकाल प्रोसेस केला आहे.
निकालसंदर्भातील महत्वाची गोष्ट म्हणजे जे उत्तीर्ण झालेत त्यांचं अभिनंदन करतो. शाळा, संस्था आणि प्राचार्य यांनी वेळेत काम पार पाडला. मंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही मेहनत घेतली त्यामुळे आज आपण निकाल जाहीर करत आहोत.
कोकण विभागाचा निकाल 100 टक्के सर्वाधिक आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित उत्तीर्ण विद्यार्थी सहा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्र्यांऐशी विद्यार्थी प्राविण्य प्रथम श्रेणीत, सहा लाख 98 हजार८८५ प्रथम श्रेणीत २१८०७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ९ ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
महाराष्ट्र एससी एचएससी बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल काही वेळात होणार जाहीर
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करणार
दहावीच्या निकालाकडं विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष
कोरोना विषाणू संसर्गामुळं दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारनं निकालाचं सूत्र ठरवलं होतं. त्याप्रमाणं गुण देण्यात आले आहेत. दहावीच्या निकालाकडं 16 लाख 58 हजार विद्यार्थ्यांसह पालकांच लक्ष लागलं आहे. निकालाची प्रत विद्यार्थ्यांना काही दिवसानंतर त्यांच्या शाळेमध्ये उपलब्ध करुन दिली जाईल.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निकालाची तारीख जाहीर करताना त्यांनी या शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!#SSC #results @CMOMaharashtra pic.twitter.com/q8dKHn1PDv— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 15, 2021
16 लाख 58 हजार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातील एकूण आठ माध्यमानुसार सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे.
दहावीचा निकाल ‘या’ वेबसाईटवर जाहीर होणार
सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
दहावीचा निकाल कशाच्या आधारे जाहीर होणार? निकालाचं नेमकं सूत्र काय?
दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
0 Comments