ऊमरखेड प्रतिनिधी - संजय जाधव
गावाला समृद्धी प्राप्त करून देण्यासाठी आपले गाव हेच आपला देश समजून प्रत्येक नागरिकाने ग्राम पंचायतीच्या घरपट्टी पाणीपट्टी कराचा भरणा नियमित करुन ग्राम विकासाचे शिलेदार बनावे असे आवाहन टाकळी( ई) येथील सरपंच सौ उज्वला हाके व उपसरपंच दिलीप जाधव यांनी गावकऱ्यांना केले आहे .
गावामध्ये शासनाकडून मंजूरी मिळालेल्या विविध विकास निधीचा उपयोग त्या - त्या योजनेसाठीच करणे बंधनकारक असल्यामुळे ग्राम पंचायतचे उत्पनाचे एकमेव साधन म्हणजे गावकर्यांकडून वसूल होणारी घरपट्टी , पाणीपटटी आदिंची सामान्य फंडा मधून रक्कम या रकमेतून गावा मधील वेळेवर उदभवनाऱ्या रस्त्यावर मुरुम टाकणे व दुरुस्ती , पथदिवे , पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्ती करणे अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयोग होतो . गावातील छोट्या मोठ्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या निधीची वाट पाहण्याची गरज भासणार नाही त्याकरीता गावकऱ्यांनी आपल्या कराचा वेळेतच भरणा केला तर ग्रामपंचायतीला आर्थिक बळ मिळेल असेही टाकळी(ई) येथील सरपंच उपसरपंच सचीव विनोद चव्हाण ग्रामपंचायत सदस्या यांनी म्हटले आहे .
0 Comments