-->

Ads

गावठी कट्टे बाळगणाऱ्याना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

धुळे शहरातील एकता नगर व तालुक्यातील आर्वी येथून पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात दोघांकडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अवैधरित्या शस्त्रे बाळगण्यामागील कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी दिली.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मालेगावरोडवरील अग्रसेन पुतळ्याजवळ असलेल्या महाकाली टायर सर्व्हिस सेंटरचा मालक सचिन रघुनाथ मासाळ याच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जावून सचिन मासाळ याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गावठी कट्टा बाळगल्याची कबुली देत आपल्या एकतानगरमधील राहत्या घरातून २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत पोलिसांच्या स्वाधीन केली. आणि दुसऱ्या घटनेत धुळे तालुक्यातील आर्वी येथे राहणाऱ्या संदीप अशोक चौधरी याने देखील स्वतःच्या कब्जात गावठी पिस्तूल बाळगल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.आर्वीत त्याचा शोध घेतला असता तो गावातील सिताराम चौकात आढळून आला. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. दोघांविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, सुशात वळवी, योगेश राऊत, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे, विलास पाटील आदींच्या पथकाने केली.



बाईट: दिलीप खेडकर (सहायक पोलिस निरीक्षक)

Post a Comment

0 Comments