ऊमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनुर हे गाव असून,निंगणुर हे गाव राजकीय दृष्टीने महत्वपूर्ण आहे.त्यामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निगंनुर ग्रामपंचायतकडे 15 सदस्य असलेल्या निगंणुर ग्रामपंचायत चे आरक्षण हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते.
ते राखीव असल्याने सरपंच पदाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.त्यानुसार दिनांक 8/ 7/ 2021 रोजी सर्वानुमते सरपंच पदी श्री सुरेश विठ्ठल बरडे यांची निवड करण्यात आली.असून,अनु जाति प्रवर्गामधून पुरुष या जागेसाठी राखीव असल्याकारणाने, सर्वानुमते सरपंचपदी सुरेश विठ्ठल बरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. असून,त्यामध्ये सूचक म्हणून अंकुश राठोड हे नेमण्यात आले होते.
ग्राम पंचायत ची निवडणूक होऊन तब्बल 6 महीने उलटले होते.या कालावधीत अनेक घडामोडी घडल्या.त्यानंतर आज रोजी निगंनुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी अध्याशी म्हणून उमरखेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी. श्री संतोष डाखोरे साहेब , ग्रामसेवक व्हि .जि.चव्हाण साहेब हे होते.यांनी या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पाडली .यावेळी नवनिर्वाचित ग्राम पंचायत सर्व सदस्य तसेच गावातील सर्व नागरिक व ग्राम पंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments