वेडसर पणाच्या आजाराने ग्रासलेल्या मोठया भावानेच घरी रात्री गाढ झोपेत असलेल्या लहान भावाच्या डोक्यावर, तोंडावर, व मानेवर गज तोडण्यास वापरात येणा-या छन्नीचे सपासप चार वार करून त्याची जागीच हत्या करण्यात आली. ही घटना गुरूवार दिनांक 01 जुलै रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ढाणकी पासुन जवळच असलेल्या करंजी येथे घडली. आरोपीला बिटरगांव पोलीसांनी अटक केली.
समाधान बापुराव घुगरे वय 12 वर्श रा करंजी असे मृतकाचे नाव आहे तर हत्या प्रकरणी सचिन बापुराव घुगरे रा करंजी वय 22 वर्श असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील काही पासुन आरोपी सचिन हा चिडचिडपणा, घबराहट आणि नैराष्य या सारख्या आजाराने ग्रस्त असल्याचे समजले. त्यामुळे तो बैचेन अवस्थेत राहत होता. घटनेच्या दिवषी मृतक समाधान नेहमीप्रमाणे घरी असलेल्या पाळीव बकरी चराई करून सायंकाळी घरी आला. दिवसभर बक-या मागे धावपळ करून थकलेल्या समाधनाने सायंकाळचे जेवन कुटूंबासोबत करून आपल्या नेहमीच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला. आई वडील आणि अन्य भाउ देखील बाजुच्या खोलीत झोपी गेले सर्व कुटूंब झोपेत असल्याचा फायदा उचलत आरोपी सचिन ने वडील घरबांधकामाच्या कामात गज तोडण्यासाठी वापरात असणारी छन्नी घेवुन समाधान झोपुन असलेल्या खोलीत षिरला आणि मागचा पुढचा विचार न करता समाधान च्या डोक्यावर मानेवर , व तोंडावर छन्नीचे सपासप घाव घालुन त्याचा जागीच खुन केला. त्यानंतर आरोपी सचिन ने रक्ताने माखलेले छन्नीचे हत्यार आई झोपलेल्या ठिकाणी येताच सपासप मारलेल्या आवाजाने किंचीतषी जागी झालेल्या आईच्या अंगावर चाल करताच बाजुला झोपुन असलेला चैदा वर्शीय भाउ सुरज याने सचिन च्या हातातील ताराने घटट बांधलेली छन्नी हिसकावुन घेतली. त्यामुळे आई च्या जिवावर बेतलेले टळले. दरम्यान च्या काळात घडलेल्या थराराने संपुर्ण कुटूंब जागे झाले. मात्र समाधान का बरे जागा झाला नाही म्हणुन भाउ सुरज त्यांच्या खोलीत जावुन पाहतो तर समाधान रक्ताच्या थारोळयात पडलेल्या अवस्थेत दिसुन आला. मोठया भावानेच लहान भावाची हत्या केल्याची वार्ता गावात वा-यासारखी पसरली. अंगाचा थरकाप सुटणा-या या घटनेने कुटूंबासह गावक-यांना धरणीमाय जागा देत नव्हती. घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण रात्र कुटूंबासह गावक-यांनी षोकाकुल वातावरणाने घालवली. सकाळ होताच पोलीस पाटील करंजी यांच्या मार्फत बिटरगांव पोलीस स्टेषनचे ठाणेदार विजय चव्हाण यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहीती दिली. पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेवुन घटनेचा पंचनामा करून आरोपी सचिन याला ताब्यात घेतले आणि समाधानचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी प्राथमीक आरोग्य केंद्र ढाणकी येथे पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणी नंतर कुटूंबाच्या हवाली समाधान यांचा मृतदेह देवुन त्यांचावर करंजी येथे षोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उमरखेड प्रतिनिधी : संजय जाधव
0 Comments