उल्हासनगर : राज्याचे मा.मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना उल्हासनगर वतीने उल्हासनगर-१ येथील गुरुद्वारा तसेच उल्हासनगर-४ येथील शांती प्रकाश हॉल येथे दिव्यांग बांधवांना व्हिलचेअर, वॉकर, कुबड्या, फोल्डिंग स्टिक, टॉयलेट चेअर आदी मदत साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच गरजू महिलांना स्वयंरोजागाराकरिता शिलाई मशीन चे मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महापौर लीलाताई आशान, शहर प्रमुख राजेंद्र चौधरी उपस्थित होते.
0 Comments