उमरखेड : तालुका अंतर्गत येत असलेल्या निंगनूर या गावात केळी कापण्यासाठी आलेला मजूर शेख कलीम या नावाने बोलल्या जात असून,मुळ गावं मराठवाड्यातील औढा नागनाथ असून, हल्ली मुक्काम वाई बाजार येथे सासरवाडीला होता. असेही बोलल्या जात आहे.तो मजूर केळी कापण्यासाठी त्यांच्या सहकार्या सोबत विदर्भातील उमरखेड तालुक्यातील निंगणूर या गावी आला होता. दिवसभर केली कापली व परत केळी कापणे झाल्यानंतर आपल्या गावाकडे परत जाताना निंगनूर येथील मोठ्या नाल्यांना फार मोठ्या प्रमाणात पूर आल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात तो शेख कलीम या नावाचा व्यक्ती वाहत गेला.या रस्त्यासाठी चिंचवाडी निंगनूर येथील जनतेनी आमरण उपोषण ही केले होते.त्या उपोषणाची सांगता तत्कालीन आमदार नामदेव ससाणे यांनी केली होती.व हा रस्ता तीन महिन्यात पूर्ण करून देतो असे आश्वासन ही दिले होते.परंतु त्या चिंचवाडी निंगनूर या रस्त्यावर कुठल्याही प्रकारे काम करण्यात आले नाही.व पुलही झाला नाही.त्या रस्त्याअभावी व पूलाअभावी आपला प्राण गमवावा लागला.असे बरेच प्रसंग त्या रस्त्या अभावी व पुला अभावी घडले. त्या पाण्याचा पुरात वाहुन गेलेल्या व्यक्तीला त्यांच्या सहकाऱ्यांनी व येथील गावकऱ्यांनी शोधले.परंतु त्यांचा शोध आणखी लागला नसून, शोध मोहीम चालू आहे.
निंगनुर ते चिंचवाडी या रस्त्यासाठी मी अनेक वेळा येथील जनतेला घेऊन आधिकार्याना निवेदन दिले .परंतु या रस्त्याकडे कोणीच लक्ष्य दिले नाही. काही महिन्यांपूर्वी येथील जनतेला घेउन उमरखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण पण केले होते. उपोषणाची सांगता आपल्या विभागाचे आमदार ससाणे साहेबांनी लेखी आश्वासन दिले होते. परंतु या रस्त्याकडे कोणाचेच लक्ष नसून,या रस्त्याआभावी आज एका जनाचा जीव गेला.व या आगोदर सुद्धा अश्या अनेक घटना घडल्या, एका महिन्याचा आत हा रस्ता मंजूर न झाल्यास मी चिंचवाडी येथील सर्व जनतेस घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार.... अंकुश राठोड माजी उपसरपंच ग्राम पंचायत नींगनूर
0 Comments