-->

Ads

महिलेची टेम्पोत प्रसूती,बाळ दगावलं मलंगगड आदिवासी पाड्यातील दुर्दैवी घटना

एका महिलेची प्रसूती टेम्पोमध्ये झाल्याने यात नवजात बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात घडली आहे.


अंबरनाथ तालुक्यातील  मलंगगड भागातील म्हात्रे पाडा या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या वंदना वाघे यांच्या बाबतींत ही घटना घडली आहे.वंदना यांना मध्यरात्री प्रसूतीसाठी मांगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टेम्पोतून घेऊन जाण्यात आले.मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा नसल्याने वंदना  यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जा असे तिथल्या  वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटूंबियांना सांगितले. मात्र उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वंदना यांना घेऊन जात असताना मध्येच टेम्पोत त्यांची प्रसूती झाली. यात त्यांचे बाळ  दगावले. मांगरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्या सुविधा नाहीत परिणामी अत्यावश्यक वेळी येथे रुग्णांवर उपचार न करता पुढे पाठवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे या आरोग्य केंद्राचा नक्की उपयोग काय असा सवाल इथले रहिवासी करत आहेत. गेल्या वर्षभरात या ठिकाणी  अशाच तीन घटना घडल्या असून त्यातही नवजात बाळ दगावले स्थानिकांचे म्हणणे आहे.आता तरी ही बातमी बघून आरोग्य यंत्रणेला जाग येणार का असा प्रश्न नागरिक करत आहे.




Post a Comment

0 Comments