-->

Ads

जन्मदात्या आईवर मद्यधुंद मुलाचा अत्याचार ; वणी तालुक्यातील ब्राह्मणी येथील घटना

माणुसकीला काळिमा फासणारी घटना जन्मदात्या आईवर मुलाने दारूच्या नशेत केला बलात्कार


यवतमाळ  प्रतिनिधी  - संजय जाधव
: माणुसकीला काळिमा फासणारी घटना वणी तालुक्यातील ब्राम्हणी या गावात घडली. जन्मदात्या आईवर मुलाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.आरोपी  गावाजवळच असलेल्या कोल वाशरीत मजुरीचे काम करतो, तो अविवाहीत आहे. ब्राह्मणी या गावी आपल्या आईवडिला सोबत वास्तव्य करीत होता. त्याला दारूचे व्यसन आहे. तो रात्री मद्य प्राशन करून आला व आई एकटीच झोपलेली असताना बळजबरीने त्याच्यावर अत्याचार केला. या घटनेने हादरलेल्या महिलेने विष प्राशन केले. तिला तात्काळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर रुग्णालयातून तिने थेट वणी पोलीस स्टेशन गाठले व विकृत मुला विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.




Post a Comment

0 Comments