जळगाव : जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावरती रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे, रात्री उशिरापर्यंत जळगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे परंतु या हल्ल्यामध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांना कोणतीही इजा यामध्ये झालेली नाही.
आज दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान दोन गटांमध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादावरून भांडण झाले होते याबाबतची गुन्हा नोंदण्याचे काम रामानंद पोलीस स्टेशनला सुरू होते हे प्रकरण मिटविण्यासाठी उपमहापौर त्याठिकाणी आले असता यावरून त्यातील एका गटाची नाराजी असल्याने त्यातून हा गुन्हा झाल्याचे प्राथमिक निदर्शनात येत असल्याची माहिती जळगाव चे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केली आहे सध्या उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले आहे.
0 Comments