-->

Ads

आषाढी पोर्णिमा च्या याचे औचित्य साधून शांतिदूत बुद्ध विहारांमध्ये वृक्षारोपण ..

           ऊमरखेड : बिटरगाव येथे शांतिदूत बुद्ध विहार परिसरात  भारतीय बौद्ध महासभा शाखा बिटरगाव बुद्रुक तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्यावतीने बोधिवृक्ष व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  अनिल काळबांडे होते तर प्रमुख पाहुणे राहुल कराळे  सहा. आयुक्त अमरावती व शंकर कांबळे तुकाराम इंगोले बाळासाहेब सावतकर यशवंत काळबांडे गजानन दामोदर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष धम्मदीप काळबांडे यांनी बौद्ध वृक्ष यांचे महत्व सांगितले व राजेसाहेब पंडित यांनी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे या विषयी मार्गदर्शन केले व अनिल काळबांडे सर यांनी बुद्ध आणि बोधिवृक्ष वर्षावास बुद्ध धम्म म्हणजे काय भारतीय बौद्ध महासभेची गरज आहे व  समता सैनिक दल यांची गरज का आहे या वर सविस्तर मार्गदर्शन केले .यावेळी  समस्त महिला मंडळ पुरुष  मंडळी प्रतिष्ठित नागरिक  युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आनंदराव वाठोरे यांनी सूतरसंचालन व  प्रमुख पाहुणे व उपस्थित मंडळी यांचे आभार मानले.


               






भास्कर कांबळे यांनी बोलताना सांगितले मी व आनंदराव वाठोरे यांनी या वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आम्ही दहाच वृक्ष लागवड करण्याचा आमचा मानस होता तेवढेच अर्थसाहाय्य आम्ही आमच्या स्वतःच्या  खर्चाने करणार होतो महिलांनी आम्हाला खूप मदत केली आम्ही पण हात भार लावू असे महिला मंडळी यांनी सांगितले आमच्या येथील काही नागरिक नोकरीसाठी बाहेरगावी आहेत त्यांना ही माहिती मिळाली व त्यांनी टीगार्ड वृक्ष आणि ठिबक सिंचन त्यासाठी लागणारा अर्थसाह्य  च्या माध्यमातून मदत केली त्यामुळे आम्ही इतका मोठा कार्यक्रम व तीस वृक्षलागवड टीगार्ड व सिंचन आम्ही करु शकलो असे भास्कर कांबळे  यांनी यावेळी बोलताना सांगितले.व पंचफुला नरवाडे यांनी बोलताना महिलांनी निंदन खुरपं करून पैसे जमा करून दिले असे पंचफुला नरवाडे यांनी सांगितले तर अभय कांबळे यांनी व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झाले व गावातील तरुण युवक यांनी मदत केली महिला शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती आहे असे अभय कांबळे यांनी बोलताना सांगितले.

ऊमरखेड :  संजय जाधव

Post a Comment

0 Comments