यवतमाळ – विविध कारणाने आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या अनाथ बालकांची १० हजार रूपयांची मुदती ठेव काढण्याचा सामाजिक भान जपणारा उपक्रम मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत आहे. आ. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून मातोश्री प्रमिलाबाई राठोड प्रतिष्ठाणच्या सहकार्याने दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघातील अनाथ बालकांसाठी हा उपक्रम आहे.
आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे अनेक मुलं, मुली अनाथ झाले आहेत. ते आपले आजी, आजोबा, मामा, काका, आत्या, मावशी आदि नातेवाईकांकडे आश्रय घेतात. अशा अनाथ बालकांच्या नावे मुदती ठेवीत रक्कम असल्यास भविष्यात १८ वर्षानंतर शिक्षणासह अनय् कामांसाठी त्याचा उपयोग त्यांना घेता येईल, या भावनेतून आ. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे. यात १२ वर्षे वयापर्यंतचा अनाथ् मुलगा किंवा मुलगी यांच्या नावे १० हजार रूपयांची मुदती ठेव बँकेत जमा करण्यात येणार आहे.
दिग्रस-दारव्हा-नेर तालुक्यात सर्वेक्षण करून अशी अनाथ बालके निवडण्यात आली. पहिल्या टप्यातात अशा २४ बालकांच्या नावे येथील ग्रामीण बँकेत मुदती ठेवी काढण्यात आल्या. त्यात कार्तीक नितीन तंबाखे, गमन सुखदेव भगत, यश अशोक जाधव, अर्पिता अशोक जाधव, यश सतीश कोटरंगे, श्रावणी गोविंदा ठाकरे, पल्लवी अनिल शिंदे, श्रेया सुनील ठवकर, रंजना पांडुरंग राठोड, प्रितम माणिक जाधव, सुजल संतोष राठोड, दिव्या संतोष राठोड, सूरज राजेश लोखंडे, कुंदन राजेश लोखंडे, रणवीर मोहन वाघमारे, वैष्णवी मोहन वाघमारे, रितेश नामदेव जाधव, पूनम दिनेश शिंदे, रोहन दिनेश शिंदे, हेमलता सुखदेव जाधव, अंजली हरिचंद चव्हाण, रूद्र कैलास चव्हाण, जागृती कैलास चव्हाण यांचा समावेश आहे.
युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते आज गुरूवारी येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या बालकांना मुदती ठेवीच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी आ. संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजय राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड,विश्वास नांदेकर युवासेना जिल्हाप्रमुख विशाल गणात्रा आदी उपस्थित होते.
अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारणे ही सामाजिक जबाबदारी – संजय राठोड
मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस-दारव्हा-नेर विधानसभा मतदारसंघातील अनाथ बालकांच्या नावे १० हजार रूपये मुदती ठेव ठेवण्याचा हा उपक्रम सामाजिक जबाबदारीचे काम आहे. या अनाथ बालकांचे पालकत्व शिवसेनेने स्वीकारले आहे, मात्र समाजातील दातृत्वशील व्यक्ती, संस्थांनीही अशा उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा, अस
0 Comments