-->

Ads

उमरखेड आशा सेविकांना जिव्हाळा संस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटाइझर चे वाटप राहत कोविड -१९ उपक्रम अविरत सुरु

 आशा सेविकांना जिव्हाळा संस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटाइझर चे वाटप राहत कोविड -१९ उपक्रम अविरत सुरु



राहत कोविड -१९ उपक्रम अविरत सुरु प्राथमिक आरोग्य केंद्र, मुळावा ता. उमरखेड जि यवतमाळ येथे इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड यांनी कोरोना कोविड -19 या महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क हेच सर्वांसाठी ढाल ठरत आहे. हे लक्षात घेता जिव्हाळा संस्थे ने संस्थे च्या नावाचे मास्क तयार करून हे मास्क मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असणाऱ्या आशा सेविकांना मास्क व सॅनिटाइझर वाटप करण्यात आले, त्या वेळी वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी, रुग्ण व स्वयंसेवक यांना शेकडो मास्क व सॅनिटाइझर वाटप करण्यात आले


  संस्थे ने मागील सतरा महिन्या पासून यवतमाळ, हिंगोली , नांदेड, वर्धा व नागपूर  या जिल्ह्यात १७६७० मास्क मोफत वाटप केले आहेत. उमरखेड शहरात व ग्रामीण भागात गावोगावी जाऊन मास्क वाटप व सर्व जनतेने नियमाचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुणे, सामाजिक व शारीरिक अंतर ठेवणे मास्क वापरणे, लसीकरण जनजागृती या सारखे जनजागृती चे कार्य संस्था युद्ध पातळीवर करत आहे. मास्क वापरल्याने नाका तोंडातून होणारा कोरोना चा संसर्ग रोखला जाऊ शकतो हे जनजागृती च्या माध्यमातून लोकांना  प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून समजावून सांगितले जाते. तसेच यवतमाळ चे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आव्हाना प्रमाणे ‘आम्ही यवतमाळकर मात करू कोरोनावर अशी जनजागृती सुरु आहे. इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था, मागील सतरा महिन्या पासून लॉकडाऊन काळातील परिस्थितीने सर्वत्र वाताहत उद्भवली होती. आशा परिस्थित जीवन जगतांना समाजातील अतिशय गरीब, गरजू, विधवा, दिव्यांग व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आदींचे आतोनात हाल होत होते.  अशा भयावह परिस्थिती मध्ये जीवाची पर्वा न करता जिव्हाळा संस्थे ने असंख्य  कुटुंबाना  राशन व किराणा कीट, मास्क व सॅनिटाइझर वाटप, लसीकरण जनजागृती, इत्यादी कार्य जिल्ह्यात सर्वाधिक केले होते मागील सतरा महिन्या पासून हजारो लोकांना मदत व सेवा कार्य अविरत करत आहेत. या वेळी मुळावा गाव चे पोलीस पाटील शंकर बरडे यांनी संस्थे च्या कार्याचे कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, या वेळी आशा सेविकांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थे च्या कार्याचे कौतुक करत संस्था वेळो वेळी त्यांना करत असलेल्या मदत व मार्गदर्शना बद्दल आभार मानले.  मास्क वाटप करतांना मुळावा येथील शहांजी खडसे, पोलीस पाटील शंकर बरडे, पत्रकार बाबा खान,  जिव्हाळा संस्थे चे अतुल लता राम मादावार, रोहित अलमुलवार, धम्मदीप कांबळे, पंकज पवार आदी उपस्थित हे होते.

Post a Comment

0 Comments