-->

Ads

अनैतिक संबंधातून अपघाताचा बनाव करून तरुणाचा खून दोघा आरोपीच्या सोनगीर पोलिसांनी आवळल्या मुसक्या...

धुळे तालुक्यातील सरवड फाट्यावर कारच्या धडकेत ठार झालेल्या जि.प. शिक्षक संदिपकुमार विश्वासराव बोरसे याच्या मृत्यूची चौकशी करतांना पोलिसांनी धक्कादायक खुलासा करीत संदिपचा अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्याने मित्रांनी च त्याचा खून केल्याचे उघडकीस आली आहे. याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मयताच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार व घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांना या अपघाताबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या. या अनुषंगाने सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील त्यांनी तपासाची चक्रे फिरवली असता मयत संदीप कुमार बोरसे हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम बघत होते. व त्यांच्या पत्नीचे एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याने मयत संदीप कुमार हे नेहमीच दारू पिऊन पत्नीला व तिचे अनेतिक संबंध असलेल्या संबंधितास शिवीगाळ करत असत. याचाच राग मनात धरून संबंधित तरुणाने अपघाताचा बनाव करून खून केल्याची तपासत निष्पन्न झाले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ समशेर शरद राठोड यास त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतले असून या दोघांनीच मिळून संदीप कुमार यांचा नियोजित कट रचून व अपघाताचा बनाव करीत खुन केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताब्यात घेतलेलल्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सोनगीर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments