प्रतिनिधी:- संजय जाधव
शिव संपर्क अभियाना अंतर्गत संपन्न झालेल्या निंगणूर येथिल कार्यक्रमामधे शिवसेना सहसंपर्कप्रमुख मा.चीतंगराव कदम यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. निंगणुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागेश वाडीतांडा,नरसिंग नाईक तांडा,मोठा तांडा,प्रेम नाईक तांडा,तुका नाईक तांडा, संतोष वाडी तांडा,या सर्व तांड्यातील नाईक व कारभारी तसेच निंगणुर येथील सकल बंजारा समाज यांनी मा.आमदार संजय भाऊ राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात यावे. त्यांच्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे असून, कुठल्याही प्रकारे संजय भाऊ राठोड दोषी नाहीत.त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते.ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, त्यांना पुनश्च एकदा मंत्रिमंडळात घेण्यात यावे. याकरिता मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित राहून निवेदन देण्यात आले.या निवेदनाचे नेतृत्व अंकुश भाऊ राठोड यांनी केले.
प्रतीकीर्या:-बंजारा समाजाला व यवतमाळ जिल्ह्याला संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाची गरज आहे. संजय भाऊ राठोड पालकमंत्री असताना बारा बारा तास जनता दरबार घेऊन, लाखो लोकांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या.त्यामुळे संजय भाऊ राठोड हे जनसामान्यांचे लोकनेते आहेत. अंकुश राठोड मा. उपसरपंच निंगणूर
0 Comments