फुलसावंगी प्रतिनिधी संजय जाधव
येथील जि.प. माध्यमिक विद्यालयात १३ जुलै च्या राञी सुमारे १० वाजता च्या दरम्यान एका सराईत गुन्हेगाराकडून वर्ग खोलीचे दार तोडून आतमध्ये ठेवलेले अंदाजे ६० ते ७० डेक्स बेंच तोडून त्याला असलेले लोखंड भंगारमध्ये विकण्याकरीता तोडत असल्याची माहीती संस्थेचे परिचर एम.एस.रणमले यांना माहीती मिळाली असता, घाटनास्थळी ते पोहचले त्यावेळी आरोपी नामे गोपाल दादाराव शिंदे हा एका मोठ्या बोऱ्या मध्ये डेक्स बेंच चे तोडलेले लोखंडी साहीत्य घेऊन जाताना दिसला त्याचा पाठलाग केला असता. शाळेच्या मैदानालगत असलेल्या भंगार दुकानाच्या रिकाम्या जागेत चोरी च्या लोखंडाने भरलेला बोरा फेकुन त्या ठिकाणा वरून पळ काढला.
सदर घटनेची माहीती महागाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक पांढरे यांनी दिली.परंतु आवघ्या १३ कि.मी.अंतरावर महागाव पोलीस स्टेशन असुन सुद्धा घटना स्थळी पोहचण्यासाठी त्यांना व त्यांच्या सहकार्यांना तब्बल दिड ते दोन तास लागला. सदर घटनेतील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जो कोणी विकत घेत असेल त्यालाही सहआरोपी करण्याची मागणी पालकांमधुन होत आहे.
▪️अनेक गुन्हे महागाव पोलीसांकडून 'अनडिटेक्ट'
सध्या महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फुलसावंगी येथे चोऱ्या चे सत्र सतत सुरू असतानाही कोणत्याच गुन्ह्यात आरोपी शोधण्यात महागाव पोलिसांना अध्याप तरी यश आले नाही. किंवा ज्या गुन्हेगारावर चोरीचे गुन्हे आहेत अशा गुन्हेगारांना साधे चौकशी साठी बोलवुनही पोलीसांकडून आपले कर्तव्य पार पाडायचे सौजन्य करता आले नाही. येथील बसस्थानकावरील ओंकार किराणा मध्ये दिनांक १८ मार्च रोजी चोरी झाल्याची फिर्याद आहे. तसेच श्रीराम किराणा येथे २१ मार्च रोजी मध्यरात्री चोरी झाली होती, येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष यांची ग्रामपंचायत कार्यालय फुलसावंगी येथून २० एप्रिल रोजी खुर्ची चोरीला गेली. येथील जि प प्राथमिक मराठी शाळा येथील २० एप्रिल च्या मध्यरात्री एक इन्वर्टर, एक बॅटरी, तीन सीसी टीव्ही कॅमेरे व इतर साहित्याची चोरी झाली तसेच बिलाल गोळी भांडार येथे २३ मार्च रोजी चोरी झाल्याची फिर्याद महागाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे विशेष म्हणजे हे सर्व ठिकाण पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आहेत.तरी देखील या एकाही घटनेत तापस पुढे सरकलाच नाही.त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या नाकारतेपणास कंटाळून बऱ्याच लहान मोठ्या चोऱ्यांच्या फिर्यादी नागरिकांन कडुन दाखल केल्या नाहीत.
▪️पोलीस चौकी झाली शोभेची वस्तू येथे पोलीस चौकी निर्माण होऊन जवळपास दोन वर्षे उलटून गेले आहेत.या चौकीमध्ये एक अधिकारी चार कर्मचारी यांची नेमणूक असल्याचे सांगितल्या जाते.परंतु येथे कोणताही कर्मचारी राञीस उपस्थित राहत नाही.या चौकीचा उपयोग हा केवळ सेटलमेंट साठीच येथील पोलीसांच्या दोन नामांकित पंटरांकडून केल्या जातो अशी चर्चा आहे.
0 Comments