एक आठवण आपल्या दारी'ऊपक्रमाअंतर्गत वृक्षारोपन एक आठवण आपल्या दारी'ऊपक्रमाअंतर्गत करंजखेड येथे वृक्षारोपण
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव महागाव :-सर्वांना प्रेरणा देणार्या'एक आठवण आपल्या दारी'या उपक्रमा अंतर्गत त्रिशरण इनलाईटनमेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्था अंतर्गत कोविड १९ रोगामुळे मृत झालेल्या व्यक्ती यांच्या घरासमोर एक वृक्ष लावण्याची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात या उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण करत असून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील ग्राम करंजखेड येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी संस्थेचे तालुका समन्वयक यांच्या
मार्गदर्शनाखाली व संस्थेचे विकास दूत म्हणून निवड केलेले आशाताई ईश्वर राठोड श्रीशा धनराज राठोड नंदाताई अजय जाधव विजय प्रकाश जाधव उमेश जाधव हजर होते. कार्यक्रमच्या प्रसंगी ग्राम पंचायत करजंखेड चे सरपंच तसेच गावामधील ग्राम पंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका , पोलीस पाटीलव गावातील कोरोणा महामारीने निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य हजर होते व त्याच गावामध्ये त्या कुटुंबातील घरासमोर एक एक वृक्ष लावण्यात आले. ग्राम पंचायत कार्यालय व जे कुटुंब त्या गावामध्ये कोरोना आजाराने पीडित होते त्या पण व्यक्ती च्या घरासमोर वृक्ष लावण्यात आले.
0 Comments