यवतमाळ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी वनमंत्री आ.संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आशा सेविका व गट प्रवर्तक यांचा कोरोना योद्धा सन्मान करण्यात आला.
माजी मंत्री ,लोकनेते,कार्यसम्राट आमदार मा.श्री संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महागाव तालुका व शहर यांच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा सेविका माया पाईकराव,शोभा पडघणे,विद्या कावळे,प्रतिभा लोखंडे, आरती रणखांब व गट प्रवर्तक ललिता खंदारे यांचा साडीचोळी ,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवुन कोरोना योद्धा म्हणुन गौरव करण्यात आला त्याचबरोबर वाहन चालकांना मस्क वाटप करून
वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते रामराव पाटील नरवाडे,जि.प.सदस्य डॉ.बि. एन.चव्हाण,सुदाम खंदारे,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल पांडे,शिवसेनेत तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे,ता.संघटक रविंद्र भारती, शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक राजु राठोड, प्रसिद्धी प्रमुख सुमित गोविंदवाड, अशोक तुमवार,महिला आघाडीच्या लक्ष्मीबाई पारवेकर, चव्हाण ताई, अनिता डोंगरदिवे सॅम कदम,देवानंद राठोड,एकनाथ सुरोशे, मनोज रंगकाम संतोष राठोड अमोल जाधव अविनाश देशमुख, अमोल चिकणे फरीदे ताई पवणराडोड, शुभम सरगर यांच्यासह शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments