नुकतीच पावसाळ्याला सुरवात झाली असून सगळीकडे धरती ने हिरवा शालू घातला आहे. चोहीकडे आता हिरवळ दिसत असून ढाणकी पासून जवळच असलेल्या पैनगंगा अभयारण्य सुद्धा विविध नैसर्गिक समृद्धी ने नटले आहे आणि ते पर्यटकांना आकर्षित करत आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ख्याती असलेल्या पैनगंगा मध्ये वाघ, बिबट, अस्वल, निलगाय, हरण,रान कुत्रे, रानडुक्कर इत्यादी wany प्राण्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि नुकतेच वन परिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर आणि त्यांच्या सहकार्याच्या मदतीने अभयारण्यात जंगल सफारी सुरु झाल्याने हे एक पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
पेंदोर यांनी या विभागाचा पदभार सांभाळल्या नंतर अनेक सुधारणा अभयारण्यात केल्या. जंगली प्राण्यासाठी पाणवठे, सोलर सिस्टीम, कुरण संगोपन यासारखे कामे करुण वन्य जिवांना अभय प्राप्त करून दिले. त्याच प्रमाणे जंगल भागातून होणारी लाकडांची अवैध तस्करी थांबण्यासाठी चेक पोस्ट वर cctv कॅमेरे सुद्धा बसवले त्यामुळे चोरट्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसला. पेंदोर यांनी रात्रीला होणारी अभयारण्य क्षेत्रातील वाहतूक सुद्धा बंद केल्याने वन्य जिवांना संरक्षण प्राप्त झाले आहे.
गडचिरोली सारख्या घनदाट जंगलात काम केल्याचा अनुभव पाठीशी घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी पेंदोर यांनी पैनगंगा अभयारण्यात कामाला सुरवात केली आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांनी या जंगलाचे नंदनवन केले. जंगल सफारी च्या माध्यमातून फक्त आणि फक्त स्थानिकांना रोजगार मिळावा हाच त्यांचा प्रामाणिक हेतू आहे. अभयारण्यात एकूण 30 गावांचा समावेश आहे. या गावातील युवकांना रोजगारा ची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने त्यांनी अंदाजे 120 युवकांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले व त्यांना परवाना काढून दिला त्याच प्रमाणे स्थानिक युवकांना गाईड चे सुद्धा प्रशिक्षण दिले जेणे करून त्यांना रोजगार प्राप्त होईल. अभयारण्य परिसरात सर्व वन नियमाचे काटे कोर पणे पालन करण्यावर त्यांचा जोर असतो. म्हणून काही लोकांना ते आवडत नसावे अशी चर्चा आहे. भविष्यात सुद्धा त्याना अभयारण्य परिसरात पर्यटकांसाठी प्रत्येक 10 किमी अंतरावर विश्रांती थांबे तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी हे नेहमीच समाजाच्या काही घटका च्या टिकेचे धनी होत असतात मात्र त्यांच्या कडे दुर्लक्ष करून आपले कार्य करत जाने हे खऱ्या अधिकाऱ्याची ओळख असते. असेच काही ओमप्रकाश पेंदोर यांच्या बाबतीत घडत असून ते त्यांच्या कामानेच त्यांना उत्तर देतील यात काही शंका नाही. पूर्वीच्या अधिकाऱ्यांशी हितसंबंध असलेल्या एजंट लोकांची पेंदोर यांच्या जवळ दाळ शिजत नसल्याने त्यांनी मानसिक त्रास देण्याचा प्रकार सध्या सुरु असल्याची चर्चा असून या एजंट लोकांना भाव न देता वनपरिक्षेत्र अधिकारी पेंदोर हे आपले कार्य करत असतात. तूर्तास त्यांनी केलेल्या अभयारण्यातील कामामुळे नागरिक आनंदित असून असा अधिकारी पुन्हा लाभणे नाही अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने बोलताना व्यक्त केली.
प्रतिक्रिया
पैनगंगा अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मी आणि माझी टीम मेहनत घेत आहोत. भविष्यात स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून चांगला रोजगार मिळावा हाच माझा उद्देश आहे यासाठी आम्ही मेहनत घेत असून ताडोबा सारखे पर्यटक पैनगंगा अभयारण्याला सुद्धा भेटी देतील असा मला विश्वास आहे .
-ओमप्रकाश पेंदोर वनपरिक्षेत्र अधिकारी, बिटरगाव
प्रतिनिधी - संजय जाधव
0 Comments