गोरसिकवाडीचे मुखिया आणि तमाम गोरसमाजाचे प्रेरणास्थान आदरणीय काशीनाथ नायक यांच्या प्रेरणेने , गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणिय प्रा संदेश भाऊ चव्हाण यांच्या आदशाप्रमाणे, गोर सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संपत भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोरसेनेनेच्या बहाद्दर कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील 267 तालुक्यात एकाच दिवशी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना निवेदने सादर केले. महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागाच्या 267 तालुक्यात ही निवेदने देण्यात आली आहे.
गोरसेनेच्या प्रमुख मागण्या....
१) स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने तात्काळ कार्यवाही करणे बाबत.
२) मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागु करणे बाबत
३) ओबीसींची जातनिहायक जनगणना करणे बाबत
४) नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देणे बाबत.
५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संयुक्त पुर्व परिक्षेचे सर्व परिक्षेचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करावे.
असे निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब यांना सर्व तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर एकाच दिवशी एकाच संघटनेकडून एकाच स्वरुपाच्या मागणीसाठी हजारो कार्यकर्ते यांच्याकडून निवेदन देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितल्या जात आहे.
त्याचप्रकारे आज गोर सेना महागाव तालुका यांच्या वतीने सुद्धा हा निवेदन देण्यात आला.
त्या वेळी दौलत नायक पेढीकर,गोर सेना विभागीय उपअध्यक्ष संजय पालतीया,तालुका अध्यक्ष आजेश जाधव ,उपअध्यक्ष विक्की आडे,विशाल पवार,गोपाल राठोड,विर पवार,गणेश राठोड,गोलु चव्हाण,संदीप चव्हाण ,संतोष राठोड, नितीन पवार,मुकेश राठोड,साहेबराव चव्हाण,निलेश राठोड,राजु नरवाडे,सनेश्वर राठोड,राजकुमार पवार,अविनाश जाधव. इत्यादी OBC बांधव हजर होते.
0 Comments