-->

Ads

फुलसावंगी आरोग्य केंद्रामध्ये रात्रीला येणारे रुग्ण वाऱ्यावर




 महागाव प्रतिनिधी- संजय जाधव

महागाव तालुक्यातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या कौतुकाने फुलसावंगी आरोग्य केंद्राचा उल्लेख जिल्ह्यातील क्रमांक एक चे आरोग्य केंद्र म्हणून घेतले जाते.ती केवळ रुग्णांना या आरोग्य केंद्रात मिळत असलेल्या सोई सुविधेमुळे रुग्ण आरोग्य केंद्रात धाव घेतात.मात्र मागील काही महिन्या पासून इतर कोणत्या तरी कारणनेच हा आरोग्य केंद्र चर्चेत राहतो. आता या अतिव्यस्त आरोग्य केंद्रात रात्रीला आरोग्य अधिकारीच नसल्याने रुग्णांची गैरे सोय होत आहे.तर रात्रीला रुग्णाची जवाबदारी ही आरोग्य सेविके वर असते.

         फुलसावंगी आरोग्य केंद्राचे नाव जिल्ह्यात मोठ्या कौतुकाने घेतले जाते.येथे मोठ्या प्रमाणात दररोज ओपीडी होते व जिल्ह्यात दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नसेल एवढा येथील मासिक प्रसूती दर आहे.गोरगरीब रुग्णा साठी अतिशय हक्काची ही जागा आहे.

एकेकाळी फुलसावंगी च्या कोणत्याही खासगी 

रुग्णालयात गर्दी नसायची तेवढी गर्दी व तेवढाच विश्वास देखील येथील आरोग्य केंद्राच्या सोई सुविधे वर नागरिकांचा होता. किती ही रात्री रुग्णाना सेवा येथे मिळत होती.

आपल्या चांगल्या कार्याच्या भरवस्यावर फुलसावंगी आरोग्य केंद्राला नावलौकिक मिळाले आहे. मात्र मागील काही महिन्या पासून हे आरोग्य केंद्र कोणत्या न कोणत्या समस्या मुळे सतत प्रकाशझोतात राहत आहे.

मागे एका प्रसूती दरम्यान महिला दगावली त्याच्या कुटुंबियांनी डॉक्टर च्या हलगर्जीपणा मुळेच महिला दगवल्याचे आरोप केले त्यामुळे सदर डॉक्टर ला इतर ठिकाणी हलविण्यात आले. कोरोना चा संसर्ग होण्या पूर्वी येथे दोन आरोग्य अधिकारी असायचे पण कोरोना काळात येथील एक आरोग्य अधिकारी महागाव कोव्हीड सेंटरला हलविण्यात आले. त्या मुळे येथे एकच आरोग्य अधिकारी होते.व त्यांची सुद्धा त्या अपघाता मुळे बदली करण्यात आली आता या रिक्त जागे वर पुन्हा महागाव येथे कोव्हीड सेंटर वरील डॉक्टर फुलसावंगी येथे नियुक्त करण्यात आले.कोव्हीड काळात फुलसावंगी महागाव येणे जान्याची डोके दुःखी थांबविण्यासाठी त्या डॉक्टर नी महागाव येथे आपलं पूर्ण बस्तानच हलविले होते.आता पुन्हा फुलसावंगी येथे नियुक्ती झाल्याने डॉक्टर महागाव फुलसावंगी येथे येणे जाणे करीत आहे. ज्या मुळे रात्रीला आलेले प्रसूती रुग, विष प्राशन केलेले व इतर इमर्जन्सी रुग्णांना डॉक्टर च्या सेवेशी वंचित राहावे लागत आहे. अशा वेळी रुग्णांची सर्व जवाबदारी आरोग्य सेविकेला हाताळावी लागत आहे. रुग्णाच्या जीवाशी चाललेला हा खेळ त्वरित थांबविण्याची नितांत गरज आहे.

Post a Comment

0 Comments