-->

Ads

अल्पवयीन मुलीची छेडछाड रोखणं जीवावर बेतलं; राज्यस्तरीय बॉक्सरची चाकू भोकसून हत्या

 

State Level Boxer Murder: अल्पवयीन मुलीची छेडछाड (Minor Girl Molestation) काढणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी गेलेल्या राज्य स्तरीय बॉक्सरची चाकूनं भोकसून हत्या (boxer stabbed to death) केल्याची घटना समोर आहे.



रोहतक, 09 जून: अल्पवयीन मुलीची छेडछाड (Minor Girl Molestation) काढणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी गेलेल्या राज्य स्तरीय बॉक्सरची चाकूनं भोकसून हत्या (state level boxer stabbed to death) केल्याची घटना समोर आहे. छेडछाड करणाऱ्या तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून संतप्त तरुणांनी बॉक्सरवर चाकूनं जीवघेणा हल्ला (Attack with knife) केला. या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बॉक्सरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेतं आहेत.

संबंधित घटना हरियाणातील रोहतक येथील असून हत्या झालेल्या राज्य स्तरीय बॉक्सरचं नाव कामेश आहे. सोमवारी कामेश आपल्या कुटुंबीयांसोबत रोहतकमधील तेज कॉलनीत राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. दरम्यान आपले नातेवाईक राहत असलेल्या परिसरात काही तरुण एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढत होते. त्यामुळे कामेश त्यांना रोखण्यासाठी गेला. याठिकाणी आरोपी तरुणांनी कामेशसोबत वाद घालायला सुरुवात केली.

काही वेळ बाचाबाची झाल्यानंतर आरोपी तरुणांनी अचानक चाकू काढून कामेशवर हल्ला चढवला. आरोपी तरुणांनी कामेशच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूने सपासप वार केले. या हल्लात कामेश घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर आरोपींनी त्याला तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. तेव्हा आसपासच्या लोकांनी कामेशला त्वरित रोहतकमधील पीजीआयएमएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण मोठ्या प्रमाणात रक्त वाया गेल्यामुळे उपचारादरम्यान कामेशचा मृत्यू


मृत कामेश बॉक्सिंगशिवाय मॉडेलिंग आणि अभिनयातही आपलं नशीब अजमावत होता. पण सोमवारी रात्री त्याची चाकूनं भोकसून हत्या केल्याने त्याची सर्व स्वप्न हवेत विरली आहेत. एका अल्पवयीन मुलीला छेडछाडीपासून वाचवायला गेलेल्या बॉक्सरची हत्या झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments